Description
विश्वनिर्मिती उर्जा आणि विचारांचे सामर्थ्य यावर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तकामध्ये श्रीमंत जीवन म्हणजे फक्त आर्थिक श्रीमंती नसून शारिरीक श्रीमंती, सामाजिक श्रीमंती, अध्यात्मिक श्रीमंती, कौटुंबिक श्रीमंती, भावनात्मक श्रीमंती, बौद्धीक श्रीमंती, सास्कृंतिक श्रीमंती, पर्यावरणात्मक श्रीमंती इत्यादींचा समावेश आहे. ह्या विश्वातील जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही जन्मतःच विजेती आहे आणि श्रीमंतीचे जीवन जगणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. पुस्तकामध्ये रहस्यमंथन विषयांतर्गत समाजातील परिपूर्ण जीवन जगणार्या व्यक्तींना श्रीमंत अशी उपाधी देण्यात आलेली आहे. झिरो क्लबपासून सुरुवात करणार्या आणि समाजात अमूल्य कार्य घडवणार्या व्यक्तिमत्त्वामध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, मा. श्री. बाळासाहेब ठाकरे, मा. श्री. आर. आर. पाटील, मा. श्री. पतंगराव कदम, आदरणीय धीरुभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित जीवनप्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. यशस्वी जीवनामध्ये विचारांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. खर्या अर्थाने हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे. वाढलेल्या झाडाला आलेली फळं आपणास दिसतात; पण तितकीच खोलवर गेलेली मूूळं आपणास दिसत नाहीत; त्याचे दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. जिवंत असणारा साप, कीडे खातो; पण मेलेल्या सापाला मात्र किडे खातात.
प्रत्येक व्यक्तीमध्ये अफाट शक्तीचा सागर आहे, आंतरिक मनःशक्तीचे दर्शन करून जिवंत करणारे हे पुस्तक आहे.