Description
जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज !
मराठी माणसाला पडलेलं एक स्वप्न ! हो स्वप्नच !
ज्यांचा इतिहास वाचून अंगात स्फूर्ती येते, मन भारावून जाते, डोळे डबडबतात.
विश्र्वाच्या पसाऱ्यात एक टिम्ब ओळख असणारा आपला शूद्र जीव अचानक मोठा होतो.
काय कारण असावं ?
शिवाजी महाराजांच्या नजरेखातर, शब्दांशिवाय प्राण द्यायला हसतमुखाने तयार असणारे मावळे , हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे,शिव काशीद,
बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक...
किती नावे घ्यावीत ? सगळी केवढी डोंगराएवढी माणसं !...
मराठ्यांच्या इतिहासातील हे सुवर्णपान !
हे पुस्तक म्हणजे असेच मनाचे पान !
इतिहासातील खंबीर, पराक्रमी तितकेच हळवे व्यक्तिमत्व !
नात्याच्या गुंत्यात न अडकता सत्याची बाजू घेणारे सरलष्कर !
त्यांचा दैदिप्यमान इतिहास वाचताना, त्यांची आभाळाएवढी उंची मोजताना, जीव सुपाएवढा होतो.
धन्य ते छत्रपती ...
धन्य ते हंबीरराव...