Description
'युगप्रवर्तक म. जोतिबा फुले' हे वि. दा. पिंगळे यांचे वैचारिक पुस्तक नव्या पिढीसाठी सर्वार्थाने मार्गदर्शक लेखन आहे. या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती असून वि. दा. पिंगळे यांच्या लोकप्रियतेची साक्ष ठरते. संस्कृतीला 'जातीय ग्रहण' लागलेल्या वर्तमानात जातव्यवस्था नाकारणाऱ्या महात्म्याचे पुस्तक आवश्यकच असणार ! लेखक पिंगळे यांनी जोतिरावांचे समग्र चरित्र सुत्ररुपाने मांडले आहे. लेखक पिंगळे हे अभ्यासू लेखक आहे. जोतिबांच्या विश्वकुटुंबवादाचा सार्वजनिक सत्यधर्म हा जाहीरनामा असल्याचे सत्य ते सांगू पाहतात. जोतिबांच्या निर्मिक संकल्पनेचाही पिंगळे यांनी सार्थ गौरव केला आहे. सत्यवर्तनाचे महत्त्व विषद केले आहे. दिनबंधू नियतकालिकेचा संपादक म्हणून जोतिबांनी केलेल्या कामगिरीचा यथार्थ गौरव लेखकाने केलाय.
डॉ. श्रीपाल सबनीस सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत