Description
डॉ. हरिवंशराय बच्चन यांना पंडित नेहरू, इंदिरा गांधी ह्यांच्यासारख्या दिग्गज राजकीय नेत्यांचा दीर्घ स्नेह-सहवास लाभला. महाकवी निराला, पंडित नरेंद्र शर्मा, (‘महाभारत’ मालिकेचे मार्गदर्शक) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी सुमित्रानंदन पंत, दिनकर प्रभृतींशी त्यांची जिव्हाळ्याची मैत्री होती. युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशांत प्रवास करून तेथील समाज, संस्कृती, साहित्य, संगीत-कलादींचा त्यांनी मनमुराद अनुभव-आस्वाद घेतला. विद्यापीठ आणि केंद्र सरकार ह्यांसारख्या नोकरशाहीच्या गडकोटांत राहूनही आपली विशुद्ध संवेदनशीलता कधीही त्यांनी बोथट होऊ दिली नाही. सत्यं-शिवं-सुंदरम्वरील श्रद्धा श्वासोच्छ्वासाइतकी मौलिक व मूल्यवान मानून त्यांनी सदैव जपली नि जोपासली... अशा अनेकविध भावपूर्ण घटितांचे हे रसार्द्र आणि हृदयस्पर्शी स्मरण.