Description
अहिल्याबाई कर्तबगार होत्याच; पण वेळप्रसंगी त्यांनी हातात तलवारही घेतली होती. स्वच्छ कारभारासाठी त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. मोहिमेवरून आल्यावर त्या सुभेदार तुकोजी होळकरांच्याकडूनही त्यांनी हिसाब मागण्याचं सोडलं नव्हतं. घरातल्या पुरुषांच्या एकामागून एक झालेल्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे आपल्या मुलीवर, मुक्तावर, विश्वास ठेवून होत्या; पण परमेश्वराच्या घरचा हा न्याय अजब होता.