Description
शिक्षण हे एक साधन आहे. साध्य नव्हे. दु:खाच्या दुष्ट चक्रातून सुटका करून घेण्याचे शिक्षण हे प्रभावी साधन आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळविणे नव्हे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून सुटका करून घेणे आणि सर्व लोकांच्या भल्यासाठी उपयोगी पडणारे ज्ञान मिळविणे, यातच खर्या शिक्षणाचे महत्त्व सामावलेले आहे. शिक्षणातून शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास झाला पाहिजे.
शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे. असे माझे ठाम मत आहे शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.
अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.
म्हणूनच सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे.
---- राजर्षी शाहू महाराज